विहीर अनुदान योजना मांगेल त्या शेतकऱ्याला विहीर 4 लाख रुपये अनुदान

शेतकरी विहीर अनुदान योजना सुरू झालेली असून, या योजनेअंतर्गत मांगेल त्या शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मिळणार आहे. जाणून घेऊया या संदर्भातील सविस्तर माहिती.

शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाला पाण्याचे एक साधन उपलब्ध व्हावे यासाठी विहीर अनुदान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहेत.

पूर्वी शेतकरी विहीर योजना यासाठी तीन लाख रुपये सरकार अनुदान द्यायचे आता याची मर्यादा वाढवून चार लाखापर्यंत झाली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी चार लाखापर्यंत अनुदान मिळणार आहेत.यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी GR काढला आहे.

शेतकरी विहीर योजनेअंतर्गत केवळ विहीर ण्यासाठी 4 लाख रुपये अनुदानच नव्हे, तर त्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना सोलार पंप देण्यात यावी हे सुद्धा GR मध्ये नमूद करण्यात आले आहे. शेतकरी विहीर योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचन सुविधा देखील उपलब्ध करून देणार आहे.

शेतीशी निगडित

शेतीशी निगडित प्रमुख पाच योजना ज्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य होणार उज्वल : top 5 scheme in farmer

शेतकरी विहीर योजनेच्या जुन्या योजनेत बदल करण्यात आला असून अस्तित्वात असलेल्या पाच विहिरीपासून 500 मीटर अंतर पर्यंत विहीर खोलण्याचा नियमात बदल करण्यात आला आहे, आणि आता तो 150 मीटर पर्यंत करण्यात आला आहे, परंतु हा नियम ठराविक बाबीतच लागू असणार आहे.

शेतकरी विहीर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची प्रगती व्हावी हा यामागचा उद्देश आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील त्या शेतकऱ्याला विहीर मिळणार आहे.

विहिरी संदर्भात काही नियम व अटी आहेत लाभार्थी पात्रता आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढील लेखात जाणून घेणार आहोत.

शेती करीत असताना शेतीसाठी लागणारा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्राकडे पाण्याचे उपलब्ध साधन नसल्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकत नाही, त्यासाठी सरकारने शेतकरी विहीर योजना सुरू केली आहे.ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे, पण पाण्याचे उपलब्ध साधन नाही, अशा शेतकऱ्यांची निवड करून त्या शेतकऱ्यांना शेतकरी विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहीर खोदकाम करण्यासाठी 4 लाखापर्यंत अनुदान सरकार देणार आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतही काही बदल करण्यात आलेले असून त्यात वैयक्तिक लाभावर अधिक भर देण्यात आलेला आहे. महात्मा गांधी रोजगार योजना ही फक्त रोजगार देणारी योजना नसून लाभार्थ्यांचा विकासात भर घालणारी योजना आहेत. मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत बऱ्याच लाभार्थ्यांना लाभ झाला असून त्यांची प्रगती झाली आहे.

ज्या शेतकरी मित्रांकडे 2.5 एकर क्षेत्र पण ते शेतकरी स्वतःच्या खर्चाने विहीर किंवा बोरवेल करू शकत नाही अशा प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी विहीर अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 एकर पेक्षा कमी शेती आहे, असे शेतकरी संयुक्तपणे या योजनेचा लाभ घेऊ शकता. शेतकरी विहीर अनुदान योजनेचा संयुक्तपणे लाभ घेण्यासाठी 2 शेतकऱ्यांना एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेता येतो. म्हणजेच एका शेतकऱ्याची 2.5 एकर जमेल नसेल, तर 2 शेतकऱ्यांची मिळून 2.5 एकर जमीन झाली तर शेतकरी विहीर अनुदान योजनेचा लाभ दोन शेतकरी संयुक्तपणे घेऊ शकतात.

विहीर अनुदान योजने साठी लाभार्थी .

लाभार्थ्याकडे स्वतःची शेत असावे,

  • अनुसूचित जाती.
  • अनुसूचित जमाती.
  • भटक्या जमाती.
  • दारिद्र रेषेखालील लाभार्थी.
  • श्री करता असलेले कुटुंब.
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती.
  • इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी.
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी वन हक्क मान्य करणारे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
  • सीमांत शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे एक हेक्टर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
http://krushibazarbhav.com/%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a1-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a4%b0/

या योजनेसाठी लाभार्थी पात्रताया योजनेसाठी लाभार्थी पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून ५०० मीटर विहीर नसावी.
  • लाभार्थ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे. म्हणजेच 40 आर किंवा ज्याला आपण एक एकर असे देखील म्हणू शकतो तर तेवढी जमीन असावी.
  • लाभार्थीच्या सातबारावर अगोरच विहीर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच त्यांच्या ७/१२वर विहिरीची नोंद नसवी.
  • दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
  • लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
  • लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा ल\लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र ०.४० पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

  • ७/१२ उतारा जो कि ऑनलाईन असावा.
  • ८ अ म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला तो देखील ऑनलाईन असावा.
  • जॉब कार्ड झेरॉक्स प्रत.
  • एखाद्या विहीर असेल परंतु ती जर सामुदायिक असेल तर अशावेळी सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र.

अशाप्रकारे शेतकरी विहीर अनुदान योजनेची माहिती आपण वर घेतलेली आहेत. अजून माहिती जाणून घेण्यासाठी आपण जीआर बघावा जीआर मध्ये आपल्याला या व्यतिरिक्त संपूर्ण माहिती मिळून जाईल, आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनी घ्यावा. पोस्ट संपूर्ण वाचल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद