2000 note ban : 2000 हजार रुपयाची नोट चलनातून बंद, तुमच्या जवळ 2000 च्या नोटा असेल तर लवकर करा हे काम

2000 note ban : 2000 हजार रुपयाची नोट चलनातून बंद, तुमच्या जवळ 2000 च्या नोटा असेल तर लवकर करा हे काम

2000 note ban : मित्रांनो 2000 रुपयाची नोट चलनातून बंद करण्याचा सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून, त्यावर कारवाई सुद्धा करणे सुरू केले आहे. RBI ने 2000 रुपयांच्या नोटा छापने बंद केलेल्या आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी भारतामध्ये नोटाबंदी झाल्या होत्या, या नोटांमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा सुद्धा बंद करण्यात आल्या, त्यांच्या बदल्यात 500 रुपयाची नवीन नोट आणि 2000 रुपयाची नोट चलनात आली होती. परंतु कालच म्हणजे 19 मे 2023 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या निर्णयानुसार 2000 रुपयाची नोट चलनातून बंद 2000 note ban करण्याचा निर्णय घेतला आहे.

Whatsapp Group Join Now
Whatsapp Group Join Now

2000 note ban : 2000 रुपयाची नोट जरी बंद झाली तरी नागरिकांना चिंता करण्आयाचे कारण नाहि, आपल्याजवळ असलेला नोटांचे काय करायचे. तर मित्रांनो तुम्हाला कुठलीही चिंता करायचे कारण नाही, कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया ने ही नोट बदलून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या नागरिकांजवळ 2000 रुपयाची नोट असेल त्यांनी ती नोट कुठल्याही बँकेत जमा करू शकतात, किंवा त्या नोटीच्या बदले आपण बँकेतून पैसे बदलून घेऊ शकतात.

2000 note ban

2000 रुपयाच्या नोटीची छपाई 2018 पासून बंद करण्यात आलेली आहे. रिझर्व बँकेने आतापर्यंत 50 टक्के नोटा ह्या जमा केलेल्या आहे. या नोटांच्या बदल्यात रिझर्व बँकेने शंभर आणि पाचशेच्या नोटा जारी केलेल्या आहेत. नोट बंदीच्या काळात पैशाचे संतुलन राहावे यासाठी ही नोट छपाई करण्यात आली होती आणि गेले चार ते पाच वर्ष ही नोट छापली गेलेली नाही.

हेही वाचा

वाळू स्वस्त झाली केवळ 600 रुपये प्रति ब्रास
वाळू स्वस्त झाली केवळ 600 रुपये प्रति ब्रास

2000 च्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत चलनात राहणार असून तोपर्यंत आपण आपल्याकडील असलेल्या 2000 च्या नोटा आपल्या बँक खात्यात जमा करू शकतात. त्याचप्रमाणे सदर नोटा या इतर चलनी नोटांमध्ये बदलून घेण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली असून दिनांक 23 मे 2000 पासून एकावेळी फक्त 20 हजार रुपये पर्यंत नोटा आपण बदलून घेऊ शकतात.

सदर चलन बदलण्याची सुविधा ही सर्व बँका तसेच RBI च्या ठराविक कार्यालयामध्ये देण्यात येणार आहे. यासंबंधी लवकरच नियमावली प्रसिद्ध केल्या जाईल. म्हणजेच आपल्या जवळील दोन हजार रुपयांच्या नोटा या अजून सुद्धा आपण चलनामध्ये वापरू शकतात. पेट्रोल पंप तसेच कुठल्याही बँक मध्ये जाऊन आपण या नोटा बदलून घेऊ शकतात. पेट्रोल पंप वर आपल्याला नोटा बदलून देण्याची सुविधा नाही. या नोटांच्या बदले आपण इंधन भरू शकतात.

नोटबंदी नंतर चलनात आलेल्या 2000 च्या नोटा या 2018 पासून छापण्यात बंद करण्यात आल्या असून जवळपास 50 टक्के नोटा या चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या आहे. सर्व खातेदार किंवा नागरिकांनी लगेच बँकेत गर्दी करण्याचे काहीही कारण नाही. आपल्या सवलतीप्रमाणे आपण 30 सप्टेंबर पर्यंत या नोटा कधीही बदलून घेऊ शकतात, किंवा आपल्या खात्यावर जमा करू शकतात.

2000 note ban 2000 ची नोट बंद का केली

2000 ची नोट बंद करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, जर गिऱ्हाईका जवळ दोन हजार रुपयाची नोट असली आणि त्याला फक्त शंभर रुपयाचे सामान घ्यायचे असेल. तर दुकानदारा जवळ एवढ्या मोठ्या रकमेचे सुटे पैसे उपलब्ध नसायचे. त्यामुळे दुकानदार ही नोट घेण्यास टाळाटाळ करत असायचे. पैसे असून सुद्धा पैशाचा वापर केला जात नव्हता, हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे.

दुसरे कारण सांगायचे झाले तर दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारामध्ये नकली सुद्धा उपलब्ध झाल्या होत्या. आणि नकली नोटा जर एखाद्या दुकानदाराकडे गेल्या आणि तो बँकेत ही नोट जमा करायला गेला तर या नोटा नकली असल्यामुळे बँकेत त्यांच्या खात्यावर जमा केल्या जात नव्हत्या, आणि त्यामुळे दुकानदाराचे आणि व्यापारी वर्गांचे खूप मोठे नुकसान व्हायचे.

या सर्व कारणांमुळे आणि इतरही काही कारणांमुळे सरकारने दोन हजार रुपयाची नोट बंद 2000 note ban करण्याचा निर्णय घेतला आहे. जर आपल्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर आपण लगेच बँकेत जाऊन या नोटा आपल्या खात्यावर जमा कराव्यात. जर आपल्याला या नोटांच्या बदले चलनी नोटा बदलून घ्यायचे असतील तर एका दिवसात 20 हजार रुपयापर्यंत आपण या नोटा बदलून करून घेऊ शकतात.

2000 रुपयांच्या ज्या नोटा चलनातून बंद केल्या जाणार आहेत. आणि जेवढ्या नोटा जमा केल्या जातील त्याच रकमेच्या नोटा बाजारात नवीन छापल्या जातील परंतु या नोटा शंभर ते पाचशे रुपयांच्या असणार आहेत.

मित्रांनो ही पोस्ट जास्तीत जास्त नागरिकांबरोबर शेअर करा म्हणजे ते सुद्धा योजनेचा लाभ घेतील धन्यवाद.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.