पीएम किसान योजना मोबाईल नंबर अपडेट करण्याची शेवटची संधी असे करा मोबाईलद्वारे PM Kisan Mobile Number Update

पीएम किसान योजना मोबाईल नंबर अपडेट करण्याची श

PM Kisan Mobile Number Update :-  नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान निधी योजनेअंतर्गत जर आपल्याला सातत्याने या योजनेचा लाभ मिळत असेल आणि बऱ्याच जणांना या योजनेच्या माध्यमातून आपला नवीन मोबाईल नंबर बदलण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहेत. किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा आता पोर्टल वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

आणि ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत आणि त्यासाठी काही कालावधी देखील निश्चित करण्यात आलेला आहेत 31 ऑगस्ट 2024 अगोदर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक अपडेट करण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहेत. अर्थात 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या लाभार्थ्यांना ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान निधी योजना अंतर्गत त्या पोर्टलच्या माध्यमातून आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल, अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी बदलता येणार आहेत.

Soyabean bhav today 17 april : आजचे सोयाबीन बाजार भाव जाहीर पहा आपल्या जिल्ह्यातील लाईव्ह सोयाबीन बाजार भाव

kapus bhav today 16 April

अशा पद्धतीने करा नवीन नंबर अपडेट PM Kisan Mobile Number Update 

पीएम किसान निधी अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो परंतु त्यांचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी अपडेट नसल्याकारणाने त्यांना ओटीपी येण्यास प्रॉब्लेम येत आहेत म्हणजे समस्या येत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी या पोर्टलच्या माध्यमातून ही कामकाज करणे आता अगदी सोपे झाले आहेत. पूर्वी दिलेल्या मोबाईल क्रमांक जर आपला काही कारणास्तव बंद झाला असेल तरी तो देखील बदलता येणार आहेत.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम पीएम किसान च्या अधिकृत पोर्टल वरती जाण्याची आवश्यकता आहे. येथे क्लिक करून अधिकृत पोर्टल वरती जा. या संकेतस्थळावरती आल्यानंतर लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या अशा बरेच सारे पर्याय त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पी एम किसान योजनेचे हे एक अधिकृत पोर्टल आहेत. याच्यात मध्ये बरेच पर्याय आहेत आणि सुरुवातीलाच मुखपृष्ठावरती आपल्याला मोबाईल नंबर अपडेट MOBILE NUMBER UPDATE असा पर्याय देण्यात आलेला आहेत क्रमांक सहा वरती त्या पर्यायावर क्लिक करायचे आहेत.

PM Kisan Mobile Number Update :-  त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मागितला जाईल किंवा आपण आपला आधार क्रमांक टाकून देखील जर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आपला माहीत नसेल तर आपण आपल्या आधार नंबरच्या माध्यमातून या पोर्टल वरती लॉगिन करू शकतात. आधार नंबर त्या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक कॅपच्या कोड टाकायचा आहेत. त्या ठिकाणी जो कॅप्चा कोड असेल तो योग्यरित्या भरून आपल्याला त्या ठिकाणी सर्च करायचे आहे म्हणजे शोधायचे आहेत.

ज्या लाभार्थ्यांचा आपण आधार क्रमांक टाकला असेल त्याचे संपूर्ण तपशील त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येतील. त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर आपल्याला आपले नाव निवडायचे आहेत आणि गेट आधार ओटीपी GET AADHAR OTP असा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आपल्याला आपल्या आधार ची लिंक असलेल्या मोबाईल वरती ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी टाकून आपण सहजरीत्या यामध्ये लॉगिन करू शकतात.

त्यानंतर लाभार्थ्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दाखवण्यात येईल जो मोबाईल क्रमांक आपण या अगोदर दिलेला आहे तो देखील दाखवण्यात येईल त्या ठिकाणी तो मोबाईल क्रमांक काढून आपण आपला नवीन मोबाईल क्रमांक टाकून त्यावरती आलेले ओटीपी टाकून सहजरीत्या त्या ठिकाणी आपला नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करू शकतात अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलद्वारे देखील कामकाज करू शकतात.

Leave a Comment