वाळू स्वस्त झाली केवळ 600 रुपये प्रति ब्रास गरिबांना होणार फायदा शासनाचा मोठा निर्णय

वाळू स्वस्त झाली केवळ 600 रुपये प्रति ब्रास गरिबांना होणार फायदा शासनाचा मोठा निर्णय, वाळू स्वस्त झालेली असून यापुढे केवळ सहाशे रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळू मिळणार आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खूप मोठा फायदा होणार असून, वाळू माफियांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. चला तर जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर माहिती.

सर्वसामान्य नागरिकाला घर बांधायचे झाले म्हणले की वाळू ही विकत घ्यावी लागते. वाळूचे वाढलेले दर बघता सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणे खूप महागात जाते. परंतु सरकारच्या निर्णयामुळे आता वाळूचे दर हे स्वस्त झालेले आहेत.

सरकारच्या या आनंददायी बातमीमुळे गोरगरिबांचे घर बांधण्याचे स्वप्न साकार होणार आहे. कारण वाळू स्वस्त मिळाल्यामुळे घर बांधण्याचा खर्च कमी होणार आहे. तर सरकार तर्फे आता केवळ 600 रुपये प्रतिब्रास या दराने वाळू मिळणार आहे.

दिनांक पाच एप्रिल 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. महसूल विभागाकडून 600 रुपये प्रति ब्रास दराने वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वाळू स्वस्त झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होणार फायदा

तर मित्रांनो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, की वाळू खरेदीचे नियम व अटी काय आहेत आणि ज्यांना वाळू पाहिजे असेल त्यांनी कोठे अर्ज करावा आणि अर्ज कसा करावा लागेल.

वाळू लिलाव बंद करून डेपोतूनच आता वाळू केवळ 600 रुपये प्रति ब्रास दराने दिली जाणार आहे,

अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. घर बांधकाम करण्यासाठी वाळू हा महत्त्वा चा घटक असल्यामुळे वाळू दलालांकडून वाटेल त्या दराने वाळू विकत घ्यावी लागत होती यामुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत होती.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना २०२३ या योजने अंतर्गत मिळवा लोन : Pm Mudra Loan

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना २०२३ या योजने अंतर्गत मिळवा लोन : Pm Mudra Loan

वाळू स्वस्त झाली असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा खूप मोठा फायदा यात झालेला आहे. वाळू घेण्यासाठी जे अव्वाच्या सव्वा भाव वाळू एजंट आकारत होते त्यांच्यावर आता आळा बसला आहे. वाळू दलाल हे ठरलेल्या आकारापेक्षा जास्त वाळू उपसा करत होते आणि सरकारची सुद्धा फसवणूक करत होते.

या सर्व गोष्टींना आळा बसावा यासाठी सरकारने वाळू स्वस्त केली आहे. आणि आता ज्यांना वाळू हवी आहे त्यांनी डेपोतून प्रति ब्रास 600 रुपये या दराने वाळू घेऊन जाऊ शकता अर्थातच वाहतुकीचा खर्च हा वाळू खरीद दाराचा असणार आहे.

वाळू दराच्या अनियमित्येला आळा बसवण्याचा प्रयत्न

वाळूजलाच्या अनियमित्येला आळा बसवण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपाय योजना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता नवीन धोरणानुसार नदीतून वाळू गटापर्यंत आणली जाणार आहे. गटातून वाळू डेपोपर्यंत वाहतूक केली जाणार आहे. डेपो निर्मिती व व्यवस्थापनासाठी एक निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू प्रति ब्रास 600 रुपये करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय एका वर्षासाठी प्रयोगी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. वाळू विक्रीचा निश्चित दर करून स्वामित्वाची रक्कम माफ केली जाणार आहे.

स्वस्त वाळू हवी असल्यास पात्रता व अटी

  • तो महाराष्ट्राचा नागरिक असावा.
  • वयाची 18 वर्षे पूर्ण असावी.
  • त्याच्या नावे जमिनीचा सातबारा असावा.
  • वाळू घेऊन त्याचा काय वापर करणार यासंबंधी माहिती द्यावी.
  • आधार कार्ड प्रमाणपत्र.
  • मतदान कार्ड प्रमाणपत्र असावे.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

जर आपल्याला बांधकामासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी वाळू खरेदी करायची असेल तर त्यासाठी अर्ज कसा करावा हे खाली बघूया.

  • महा खनिज या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध आहे.
  • मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडा.
  • काही सूचना येतील त्या वाचून घ्या
  • साइन इन या पर्यायावर क्लिक करा. युजरनेम आणि पासवर्ड नसेल तर साइन अप या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि सबमिट बटन वर क्लिक करा.
  • थोडक्यात तुम्ही वेबसाईटवर आपले एक अकाउंट खोला.
  • आता या ठिकाणी वाळू संदर्भात विविध प्रकारचे अर्ज दिलेले आहेत आपल्याला कुठल्या प्रकारासाठी वाळू पाहिजे आहेत प्रकार निवडून अर्ज सबमिट करा.

अर्ज केल्यानंतर आपल्याला वाळूसाठी संमती मिळाली की संमती मिळाल्याच्या 30 दिवसाच्या आत आपल्याला डेपोतून वाळू नेने गरजेचे आहे. जर आपण ती दिवसाच्या आत वाळून गेली नाही तर आपला अर्ज रद्द करण्यात येईल.

डेपोतून वाळून येणे हे नागरिकांसाठी स्वस्त झालेले असून फक्त 600रुपये प्रति ब्रास या दराने संपूर्ण महाराष्ट्रात वाळू मिळणार आहे. सहाजिकच या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिक घेतील आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करतील.

याविषयी अजून माहिती हवी असल्यास आपण महाखणीच्या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती वाचू शकता. किंवा आपल्या जवळच्या तहसील विभागात जाऊन सुद्धा आपण याविषयी सविस्तर माहिती मिळवू शकतात.

शेतकरी मित्र या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता

गाई म्हशी अनुदान योजना आता मिळावा 1 लाख रुपये अनुदान शासनाचा नवीन GR : New goverment scheme

Whatsapp Group Join Now
Whatsapp Group Join Now