शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार 4000 रुपये, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी

शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी मिळणार 4000 रुपये, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी.

शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी असून शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला चार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत 6 हजार रुपये वर्षाकाठी मिळत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना आता आणखी 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये वर्षाला मिळतील.

शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. 1.15 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेपोटी राज्य सरकारला 2023-24 या आर्थिक वर्षात 6 हजार 900 कोटी रुपये खर्च येणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. यानुसार पहिला हप्ता एप्रिल ते जुलै व दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च असा जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धती सुधारणा करण्यात आलेली आहे.

संनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समित्या देखील स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी किसान किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि सीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण वर्षाकाठी 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Kusum Solar Pamp

Maharashtra old age pension scheme

या पैशाचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. वर्षाकाठी बारा हजार रुपये टप्प्याटप्प्याने मिळणार असून, एका वर्षात तीन हप्त्यात हे पैसे दोन दोन हजार रुपये प्रति हप्त्याप्रमाणे जमा केली जाणार आहेत.

शेतकऱ्यांना पैशाची अडचण बसू नये, यासाठी या योजनांचे अंमलबजावणी सरकारने करण्याचे ठरवले आहे. बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांपुढे आर्थिक संकट उभे राहिल्यामुळे शेतकरी मित्र चुकीचे पाऊल उचलतात. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत. अशातच सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना कुठे ना कुठे आर्थिक टंचाई भासणार नाही.

सरकारने शेतकऱ्यांसाठी अशा विविध प्रकारच्या योजना राबवायला सुरुवात केलेली आहे. पी एम किसान योजना आणि सीएम किसान योजना या योजनांच्या व्यतिरिक्त सुद्धा शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना सरकार राबवत आहे. शेतकऱ्यांचा विकास व्हावा आणि शेतकरी स्वाभिमानी व्हावा हा या योजनांचा उद्देश आहे.

शेतकऱ्यांसाठी नुकत्याच काही योजनांची घोषणा सरकारने केलेली आहे. त्याचाही फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. बऱ्याच साऱ्या योजना बद्दल शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती भेटत नसल्यामुळे, शेतकरी अशा योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या मते या योजनांचा लाभ घेणे म्हणजे खूप किचकट आहे. त्याच्यासाठी खूप कागदपत्रे लागतात. आणि याची पूर्तता आपण करू शकत नाही. त्यामुळे शेतकरी या योजनेचा लाभ घेत नाही.

परंतु शेतकरी मित्रांसाठी आपल्या वेबसाईटवर अतिशय सोप्या पद्धतीने कुठल्याही योजनेची माहिती दिली जाते. आपण संपूर्ण माहिती वाचल्यानंतर कुठल्याही योजनेत आपण सहजासहजी भाग घेऊ शकता. योजनेसाठी लागणाऱ्या पात्रता. आणि कागदपत्रे आपल्याला आधीच माहिती असल्यामुळे आपण जर योजनेस पात्र असाल तर आपण कागदपत्रांची पूर्तता करावी आणि ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने योजनेसाठी फॉर्म भरावा.

आणि सहजरीत्या आपण कुठल्याही योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता आपण सरकारच्या अशाच काही योजना पाहणार आहोत ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

अधिक योजना बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारी योजना बद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्याला महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व सरकारी योजनांची माहिती, एकदम सोप्या भाषेत वाचायला मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now