शेतीशी निगडित प्रमुख पाच योजना ज्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य होणार उज्वल : top 5 scheme in farmer

सरकार वेळोवेळी शेतीशी निगडित प्रमुख योजना राबवत असते त्याचपैकी काही योजनांची माहिती आपण येथे पाहणार आहोत, या योजनांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. शेतीशी निगडित प्रमुख 5 योजना ज्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य होणार उज्वल : top 5 scheme in farmer

1. शेतीशी निगडित पहिली योजना म्हणजे सलोखा योजना

आता सलोखा योजना म्हणजे काय हे समजून घेऊया आणि ही योजना कोणासाठी आहे, ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी आहे, ज्या शेतकऱ्यांचे जमिनीवरून वाद चालू आहेत जमिनीचा वाद किंवा ताब्याचा वाद किंवा बांधावरून वाद चालू आहे.

अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. तर हे प्रकरण मिटवताना जे काही मुद्रांक शुल्क असते, मोजणी फीस असते, ती खूप जास्त असते. त्यामुळे बऱ्याचदा हे प्रकरण मिटत नाही. म्हणून हे तबे अदला-बदल करताना, योग्य शेतकऱ्याची जमीन योग्य शेतकऱ्याकडे देताना जी नोंदणी फीस आहे, जे मुद्रांक शुल्क आहे, ते सरकारने आता खूप कमी केले आहे. या सलोखा योजनेअंतर्गत हे मुद्रांक शुल्क कमी झाले आहे.

मुद्रांक शुल्क सलोखा योजनेअंतर्गत फक्त 1000 रुपये ठेवण्यात आले आहे. आणि नोंदणी फीस 100 ठेवण्यात आली आहे, जेणेकरून शेतीशी निगडित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागतील, जर तुमच्याकडे एखादे असे प्रकरण असेल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सलोखा योजनेअंतर्गत आपण तो लाभ घेऊ शकता.

राशन कार्ड
राशन कार्ड वरती मिळणार पैसे ration card big update

2. शेतीशी निगडित दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना



प्रधानमंत्री कृषी सिंचित योजना केंद्र सरकारची योजना आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन बसवायचे असेल, तर त्यासाठी सरकार अनुदान देते. आता हे अनुदान सरकार किती देते तर ते दोन भागात आहे. पहिला प्रकार म्हणजे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या शेतकऱ्यांना 55 टक्के अनुदान मिळते. आणि इतर शेतकरी जे ओपन वर्गामध्ये येणारे शेतकरी आहेत त्यांना 45 % अनुदान सरकार देते.

म्हणजे शंभर रुपये खर्च आला असेल तर अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदाना पोटी 55 रुपये मिळणार, तर इतर शेतकऱ्यांना 45 रुपये अनुदान मिळणार, आणि उर्वरित रक्कम ही शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे ते पाहू

पहिली अट म्हणजे आपण शेतकरी असणे गरजेचे आहे.
शेतकऱ्याकडे सातबारा असणे गरजेचे आहे. सातबारा वरती बागायती क्षेत्र असल्याची नोंद असावी, तुमचे क्षेत्र हे पाच हेक्टर पेक्षा कमी असावे, किंवा पाच हेक्टर पर्यंत असावे. त्या सातबारावरती विहिरीची किंवा बोरवेलची नोंद असावी शेतकऱ्याकडे वैयक्तिक वीज बिल असावे. मागील महिन्यातले भरलेले विज बिल सुद्धा असणे गरजेचे आहे .

ही सर्व कागदपत्रे शेतकऱ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्जात जोडायची आहे. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला पूर्वसंमती येणार आहे. पूर्वसंमती आल्यानंतर शेतकऱ्याला नजीकच्या डीलर कडून तो संच खरेदी करायचा आहे. संच खरेदी केल्यानंतर त्याचे पक्के GST बिल आपल्याला ऑनलाइन अपलोड करायचे आहे. GST चे पक्के बिल अपलोड केल्यानंतर आपल्या बँकेचे डिटेल ऑनलाईन पद्धतीने द्यायचे आहे. या सर्व संचावरती जे काय अनुदान आहे, ते थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होईल. शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टी ऑनलाईन आहेत. त्यामुळे या गोष्टी खरेदी केल्यानंतरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना २०23
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना २०23

3. शेतीशी निगडित तिसरी योजना म्हणजे सदन कुक्कुटपालन योजना

ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्याकडे छोटी छोटी लघु उद्योग आहेत, ते उद्योग अजून चांगल्या प्रकारे चालावे, त्यांना चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने सदन कुक्कुटपालन योजना आणली आहे. जे शेतकरी आधीपासूनच कुक्कुटपालन करत असतील, शेळी पालन करत असतील, किंवा मत्स्यपालत करत असतील, ते शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पात्रता
तुमच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जिल्हा पशुसंवर्धन विभाग किंवा तालुका पशुसंवर्धन विभाग किंवा पंचायत समिती यांच्याकडून या योजनेची माहिती घ्यायची आहे, आणि या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.

4. शेतीशी निगडित चौथी योजना म्हणजे अहिल्या शेळी पालन योजना

ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे अनुसूचित जाती जमाती मधील आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने शेळी व्यवसाय आहे, किंवा ज्यांना याचा अनुभव आहे. योजनेचे स्वरूप असे आहे 10 शेळ्या आणि 1 बोकड खरेदी करण्यासाठी तुम्हाला शासन 90% रक्कम देते म्हणजे 59400 रुपये शासन तुम्हाला देणार आहे.

पात्रता
1.लाभार्थी शेतकरी असणे आवश्यक आहे.
2.लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असायला हवा
कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड बँकेचे कागदपत्र असणे आवश्यक आहे.
3.लाभार्थ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे
4.लाभार्थ्याला खास करून शेळीपालनाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

Pm कुसुम सोलार
Pm कुसुम सोलार योजना नवीन नोंदणी 2023

5. शेतीशी निगडित पाचवी योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याला वीज देणे शक्य होणार नाही. अशा शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात येणार आहे, यात मोठी सबसिडी सुद्धा मिळणार आहे. हा पंप पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारा आहे. या पंपासाठी लागणारी 95 % रक्कम राज्य सरकार देणार आहे, उर्वरित 5% रक्कम ही लाभार्थ्यांना द्यावी लागणार आहे.

या योजनेच्या अटी
लाभार्थ्याकडे वीज कनेक्शन नसावे, जर तुमच्याकडे वीज कनेक्शन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याच्या सातबारे वर विहीर किंवा बोरवेल असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन असेल तर तुम्हाला 3 HP पर्यंत पंप मिळणार आहे. जर तुमच्याकडे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला 5HP पंप मिळू शकतो. किंवा यापेक्षाही जास्त जमीन असेल तर तुम्हाला 7.5 HP चा पंप मिळू शकतो.

पात्रता
ज्या शेतकऱ्याकडे पाण्याचे साधन आहे परंतु वीज नाही, अशा शेतकऱ्यांना हा पंप देण्यात येईल. शेतकऱ्याच्या नावावर वीज कनेक्शन नसावे. शेतकऱ्याच्या सातबारा वर विहीर बोरवेल असल्याचा उल्लेख असावा. अशा प्रकारची सर्व कागदपत्रे जमा करून महावितरणच्या ऑफिसियल वेबसाईटवर अर्ज केल्यास आणि पात्र झाल्यास शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळू शकतो.

जर शेतकरी दुर्गम आदिवासी भागातील असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महावितरणच्या वेबसाईट वर अर्ज करावा लागेल.

सर्व शेतकरी शेतीशी निगडित या 5 योजनांचा लाभ नक्की घ्यावा, आणि इतर शेतकरी मित्रांना पण ही पोस्ट शेअर करावी.