Rain Alert महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यासह इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे राज्यात उष्णता वाढली असून त्याचे परिणाम दिसून येत आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नैऋत्य राजस्थानात समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून गुजरात महाराष्ट्र कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडू पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. विदर्भातील अकोला येथे देशातील इच्छांची तापमान 44.9 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. राज्यात कोणाचा चटका वाढतच आहे.
शनिवारी दिनांक 2 मे सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला सह सोलापूर परभणी आणि धुळे येथे 44 डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंद झाले. तर जळगाव आणि अमरावती येथे 43 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंद करण्यात आले. तसेच जेजुर मालेगाव छत्रपती संभाजी नगर परभणी चंद्रपूर वाशिम आणि यवतमाळ येथे 42 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर सांगली आणि बुलढाणा येथे 41 अंशापर्यंत तापमान नोंदवण्यात आले.
हवामान तज्ञ पंजाबराव दख यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला आहे. जसे हवामान खात्याने वर्तवले आहे त्याचप्रमाणे पंजाबराव दख यांनी अत्यंत तंतोतंत अंदाज दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
Rain Alert शेतकऱ्यांना सूचना
पंजाबराव दख यांनी शेतकऱ्यांना सूचना देत असे म्हटले आहे की शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. ज्या शेतकऱ्यांचे पीक अजून पर्यंत शेतात आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ते योग्य ठिकाणी साठवून ठेवावे. ज्या शेतकऱ्यांचा कांदा शेतात पडून आहे अशा शेतकऱ्यांनी तो एकतर मार्केटला नेऊन विकून टाकावा, नाहीतर योग्य ठिकाणी साठवून ठेवावा. नसता शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
हे पण वाचा : Nuksan Bharpai खरीप हंगाम नुकसान भरपाई मंजूर 2024 | इथे वाचा जिल्हानिहाय संपूर्ण यादी
Rain Alert पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा
जसा पाऊस पडल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या नुकसान होणार आहेत तसेच पाऊस पडल्यामुळे काही शेतकऱ्यांचा फायदाही होणार आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आले पीक घेतले आहे. परंतु आले पिकाला पुरेसा भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आले पीक न आले पिकाचे दर वाढ होण्याची वाट बघत आहे. परंतु पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे त्यांना नाविला जास्त आले पीक काढावे लागत आहे आणि विकावे लागत आहे.
हे पण वाचा : राज्यात या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
जर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस झाला तर आले उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. एवढेच नव्हे तर उन्हामुळे शेताची नागरणी करणे सुद्धा अवघड जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जर पाऊस पडला तर, शेतकऱ्यांना नागरणी वखरणी करण्यासाठी जमीन भुसभुशीत होईल. यामुळे इंधन ची बचत तसेच शेतकऱ्यांच्या नागरणीचा तसेच इतर शेतकऱ्यांचा खर्चही वाचेल.
Rain Alert तरी येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हवामान खात्याने वर्तवल्यानुसार दिनांक 5 मे ते 10 मे च्या दरम्यान कधीही पाऊस येऊ शकतो. किंवा अचानक वादळी वाऱ्यास गारपीटही होऊ शकते. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होतात शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुखरूप जागेवर बांधावी.