Cotton News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाब, सरकारने आयात केल्या 22 लाख कापसाच्या गाठी
Cotton NewsCotton News कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाप समोर येत असून, सरकारनेच शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आता हाती आलेल्या बातमीनुसार राज्य सरकारने आचारसंहिता लागण्याच्या आधीच बावीस लाख कापसाच्या गाठी आयात करून ठेवल्या आहेत. यामुळे देशातील आणि राज्यातील कापसाचे भाव आपोआप कमी होणार आहे.
सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितांचा नसून, कापसाची टंचाई भासू नवी या हेतूने सरकारने 22 लाख कापूस गाठींची आयात केली आहे. आपल्या उद्योग धंद्यांसाठी कापूस कमी पडू नये यासाठी सरकारने उचललेले हे एक पाऊल आहे. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तसेच देशातील संपूर्ण कापूस उत्पादक शेतकरी यांचे हाल होणार आहे.
Cotton News या कारणांमुळे नाही वाढणार कापूस पिकाचे भाव
22 लाख कापूस गाठींचे आयात झाल्यामुळे, काco गाठींची उपलब्धता झालेली आहे. त्यामुळे सध्या तरी कापूस भाव वाढू शकेल अशी काही चिन्हे दिसत नाही. राज्यात सध्याचा विचार केला तर कापूस या पिकाला 6500 ते 7000 हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे. या भावामध्ये शेतकऱ्यांनी शेतीला लावलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. Cotton News
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कापसाला कमीत कमी 10 हजार रुपये तरी भाव मिळायला हवा, तेव्हा कुठे उत्पादन खर्च भरून निघेल आणि दोन पैसे खिशात पडू शकतील. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल असे कुठलेही चिन्ह सध्या तरी दिसत नाही. यावर्षी कापूस या पिकाला जास्तीत जास्त भाव 7500 ते 8000 पर्यंतच मिळू शकतो.
यात अजूनही आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकीच्या नंतर येणाऱ्या सरकारने जर परत कापसाचे आयात केली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विकल्याशिवाय पर्याय नाही. Cotton News
काही शेतकऱ्यांनी निवडणूक होईपर्यंत कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच जोपर्यंत निवडणूक होत नाही आणि नवीन सरकार येत नाही तोपर्यंत कापूस विकायचा नाही हा निर्णय बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांचा किती योग्य आहे हे आता निवडणूक झाल्यानंतरच कळेल.
सध्याची परिस्थिती पाहता कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. आणि मागील सरकारने 22 लाख कापसाच्या गाठी आयात करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर एक मोठे संकट उभे केले आहे. भाव वाढीचे सर्व रस्ते मागील सरकारने सध्या तरी बंद केल्याचे दिसत आहे. कुठल्याही परिस्थितीत कापूस उत्पादकांना भाव वाढवून मिळणार नाही अशी व्यवस्था मागील सरकारने करून ठेवले आहे. Cotton News
Soyabian bhav today 8 November 2024 दिवाळीच्या मुहूर्तावर सोयाबीन बाजारभावावर प्रभाव..! सोयाबीन बाजार भावात झाली वाढ
नवीन सरकार जरी आले तरी मागील सरकारने ज्या 22 लाख कापसाच्या गाठी आयात केलेल्या आहे. त्या परत करता येणार नाही त्यामुळे सध्या तरी कापूस व्यापाऱ्यांना 22 लाख कापसाच्या गाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या तरी कापूस या पिकाला कुठल्याही प्रकारचे भाव वाढून मिळणार नाही असे चिन्ह सध्या दिसत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांनी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देण्याचा सपाटा सुरू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकजूट होण्याची मोठी संधी आहे.
योग्य उमेदवाराला मतदान करून आपल्या शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जो कामे करेल त्याच उमेदवारांना मतदान शेतकऱ्यांनी करायला हवे. आपल्या शेतीला हमीभाव मिळवून देण्यासाठी जो उमेदवार प्रयत्न करेल त्याच उमेदवाराला निवडून देण्याचा प्रयत्न शेतकरी यांनी केला पाहिजे. Cotton News
कापुस भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा