अग्रिम पिक विमा 15 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार Advance crop Insurance

अग्रिम पिक विमा 15 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार Advance crop Insurance

Advance crop Insurance : Nanded news नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून, येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत अग्रिम पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गात एक अशीच एक किरण आलेले आहे. आधीच दुष्काळजन्य परिस्थिती त्यातच नोव्हेंबर मध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे भल्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 1700 कोटी रुपये Crop Insurance

Crop Insurance
Crop Insurance

हेही वाचा : Panjab dakh live सर्व शेतकऱ्यांसाठी तातडीचा मेसेज 11 ते 15 डिसेंबर राज्यात मुसळधार पाऊस

राज्य सरकारने पिक विमा कंपन्यांना अग्रिम पिक विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश दिलेले असून सुद्धा, काही विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केलेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात रोष निर्माण झाला होता. सरकारने अग्रिम पिक विमा शेतकऱ्यांना द्यायचे सांगितले असूनही कंपनी हे पैसे शेतकऱ्यांना का देत नाही असा सवाल शेतकरी वर्गात निर्माण झाला होता.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला ठोकणार ताळे Advance crop Insurance

त्याच अनुषंगाने शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील सांगवीकर व बालाजी पाटील भोसले यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करत नसल्यामुळे. या कंपनीने 15 डिसेंबर पूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांना संपूर्ण पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी. अन्यथा जिल्हाभरातील शेतकऱ्यांना घेऊन कंपनीला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन देताना दिला आहे. Advance crop Insurance

यापूर्वी जून जुलै महिन्यात अतिवृष्टी ढगाळ वातावरण यामुळे सलग पावसाचा खंड त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पीक विम्याची अधिसूचना लागू केलेली आहे.

शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका महिन्याच्या आत अग्रिम पिक विमा जमा होणे अपेक्षित होते परंतु पिक विमा कंपन्यांनी अद्याप पर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यात संतापाची लाट पसरलेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर मध्ये शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम मिळाली होती.Advance crop Insurance

पण यावर्षी डिसेंबर महिना संपायला आला असून सुद्धा पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकरी पुत्र संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. पिक विमा 15 डिसेंबरच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करा अन्यथा 16 डिसेंबरला कंपनीला टाळे ठोकणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.

यावेळी बालाजी पाटील सांगवीकर, बालाजी पाटील धोसणे, गणपत पाटील सुडके, प्रकाश शिंदे हसनाळकर, रावसाहेब शिंदे आधी शेतकरी उपस्थित होते.