Cotton News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा भावात वाढ होण्याची शक्यता.

Cotton News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा भावात वाढ होण्याची शक्यता.

सध्या कापूस या पिकाला भाव कमी असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या चिंतेचा काळ आता संपलेला असून लवकरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. Cotton News कारण कापूस या पिकाचे भाव दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या दहा दिवसात कापसाचे बाजार भाव हे 200 ते 300 रुपयांनी वाढलेले आहे.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाच्या गाठींची किंमत वाढल्यामुळे कापसाला भाव मिळत असल्याची चर्चा सध्या तरी जोर धरत आहे. यावर्षी सीआयडी कापूस उत्पन्नाची जी आकडेवारी काढली होती, ती चुकीची ठरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. Cotton News

सीसीआयने ठरवलेल्या आकडेवारीनुसार कापसाचे उत्पन्न हे कमी झाले आहे. विषयाने आकडेवारी उत्पन्न जास्त दाखवले असल्यामुळे यावर्षी सुरुवातीलाच कापूस पिकाला भाव कमी मिळत होता. परंतु प्रत्यक्षात कापसाचे उत्पन्न हे खूप कमी प्रमाणात निघाले आहे. त्यामुळे आता कापूस हंगामाच्या शेवटी शेवटी कापूस या पिकावर निर्भर असणारे उद्योगधंदे यांना कच्च्या मालाची कमतरता भासत आहे.

कापूस उद्योग धरणांना कच्च्या मालाची कमतरता भासत असल्यामुळे, या उद्योगधंद्यांनी कापूस वाढीव भावात घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेवटी का होईना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येतील अशी आशा सध्या लागून आहे. Cotton News याचाच परिणाम असा झाला आहे की गेल्या दहा दिवसात दोनशे ते तीनशे रुपयांनी कापूस भावत वाढ दिसत आहे.

यावर्षी कापूस हंगामाच्या सुरुवातीला 6500 ते 7000 हजार रुपये या दरम्यान शेतकऱ्यांना कापसाचा भाव मिळाला. परंतु हा भाव अगदी किरकोळ असल्यामुळे शेतकऱ्यांना नफ्यापेक्षा उत्पादन खर्च जास्त लागला आहे. सीसीआयच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. Cotton News

आजचे कापुस बाजार भाव दिनांक 3 जानेवारी 2025 Cotton price today 3 january 2025

दरवर्षी सीसीआयचे फोल्ड ठरणारे अंदाज यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दरवर्षी महाग होत असलेले बी बियाणे, आणि खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी आधीच डब्बायला आलेला आहे. जेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खत बियाणे औषधी यांचे भाव वाढलेले आहेत त्या प्रमाणात पिकाला भाव मिळत नाही.

पिकांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ वळवली आहे. कापूस या पिकाचे उदाहरण आपण नुकतेच वर बघितले आहे. असे सोयाबीन तूर आणि इतरही पिकांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भावच मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आपला उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत सध्या तरी शेतकरी घावला आहे.

ज्या पिकाचे भाव वाढायला सुरुवात झाली त्या पिकाची आयात सरकार करते आणि त्या पिकाचा भाव आपोआपच कमी होतो. देशात कापूस असूनही 22 लाख कापसाच्या गाठी महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वीच आयात करून ठेवल्या होत्या. त्यामुळे कापूस या पिकाचे भाव वाढण्याचा रस्ताच सरकारने बंद केला होता असे म्हणता येईल.

कापसाचे लाईव्ह बाजारभाव पाण्यासाठी खाली क्लिक करा Cotton News

ज्या शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विकणे बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी आता जास्त वाट न पाहता कापूस देणे योग्य राहील. आणि ज्या शेतकऱ्यांना कापूस अजूनही ठेवायचा आहे ते शेतकरी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत कापूस भाव वाढीची वाट बघू शकतात. फेब्रुवारी नंतर मात्र उन्हाचा चटका वाढणार आणि आपल्या कापसाचे वजन कमी होणार. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होईल.

ही पोस्ट आवडल्यास नक्की दहा शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपला शेतकरी मित्र धन्यवाद..

Leave a Comment