राज्यातील या जिल्ह्यातील तालुक्यांना वगळले दुष्काळग्रस्त यादीतून..! यादी पहा New Dushkal Anudan List

राज्यातील या जिल्ह्यातील तालुक्यांना वगळले दुष्काळग्रस्त यादीतून..! यादी पहा New Dushkal Anudan List

Dushkal Anudan List : नमस्कार शेतकरी मित्रांनो, बरच साऱ्या जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्यामुळे बरेच शेतकरी आनंदात आहे, परंतु काही शेतकरी असे सुद्धा आहेत की जे दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे किमतीत सापडले आहे. कारण आपणा सर्व शेतकरी मित्रांना माहीतच आहे की यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांचे खूप नुकसान झालेले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 35 हजार रुपये..! राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर New Duskal Anudan Yojana

Duskal Anudan Yojana
Duskal Anudan Yojana

दुष्काळजन्य परिस्थिती असून सुद्धा जिल्ह्यातील काही तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्या गेले तर काही तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षात पाहिले तर जिल्ह्यामध्ये सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. परंतु सरकारच्या कपटी धोरणामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार तर काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे.

तर कोणकोणत्या जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळग्रस्त वगळले आहे आणि त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही या तालुक्यांची नावे आपण पाहूया, सर्वात प्रथम छत्रपती संभाजी नगर आणि सोयगाव या जिल्ह्यातील काही तालुक्यांना दुष्काळग्रस्त भागातून वगळण्यात आले आहे. त्यापैकी गंगापूर वैजापूर सिल्लोड पैठण फुलंब्री आणि कन्नड या तालुक्यांचा समावेश आहे.

या तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस न होऊनही या जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आलेले आहे. यामागचे कारण अजूनही समोर आलेले नाही या तालुक्यातील तहसीलदारांनी कुठल्या आधारावर या तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळले हे अद्यापही समोर आलेले नाही. प्रत्यक्षात माहिती घेतली असता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बघितले असता, शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षात समोर आले आहे.

वैजापूर तालुक्यातही अशीच परिस्थिती असून वैजापूर या भागालाही सरकारने दुष्काळग्रस्त यादी समावेश केलेला नाही वैजापूर येथे दरवर्षी साधारण 550 मिलिमीटर पाऊस पडत असतो. मात्र यावर्षी वैजापूर येथे केवळ 414 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. वैजापूर येथील दोन ते तीन भागात जोरदार पाऊस पडलेला असला तरीसुद्धा येथील आठ ते नऊ भागांमध्ये पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आलेली आहे.

तरीही वैजापूर या भागाला दुष्काळग्रस्त यादीतून नाव वगळण्यात आलेले आहे. केवळ दोन भागात व्यवस्थित पाऊस झाला आणि येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही या अनुषंगाने वैजापूर या पूर्ण भागाला दुष्काळग्रस्त यादीतून काढणे हे योग्य नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वैजापूर येथील शेतकरी सरकारवर आपला संताप व्यक्त करत आहे.

महाराष्ट्रात असे बरेच जिल्हे आहेत की एका तालुक्यात दुष्काळग्रस्त म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळत आहेत तर दुसऱ्या तालुक्यात पाऊस नसूनही त्या तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही. प्रत्यक्षात पाहणी केल्यास असे निदर्शनात येते की ज्या तालुक्याचे दुष्काळग्रस्त यादीत नाव आलेले आहे. त्या तालुक्यात परिस्थिती चांगली असून, ज्या तालुक्याचे नाव दुष्काळग्रस्त यादीत आलेले नाही त्या तालुक्याची परिस्थिती अतिशय हरवलेली आहे.

सरकार शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव करत असल्याच्या टीका सध्या शेतकरी वर्ग करत आहे. या आमदार खासदार यांच्या बोलीवरून विविध तालुक्यांनाच फक्त दुष्काळग्रस्त यादीत सामील केले आहे. आमदार किंवा खासदार यांना ज्या तालुक्यातून मतदान चांगले मिळाले आहे अशाच तालुक्यांचा समावेश सध्या दुष्काळग्रस्त यादीत असल्याचे समोर आले आहे.

परंतु सत्ताधाऱ्यातील आमदारांना ज्या तालुक्यातून मतदान मिळालेले नाही किंवा कमी मिळाले आहे. अशा तालुक्यांना सरकारने दुष्काळग्रस्त यादीतून वगळले आहे, अशा टीका सध्या शेतकरी वर्ग करत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विविध मोर्चे सुद्धा काढलेले आहे. थेट बांधावर येऊन पाहणी करावी असे सुद्धा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतीविषयक असेच नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती आपण थेट आपल्या मोबाईलवर सुद्धा बघू शकतात. त्यासाठी वर येत असलेल्या शेतकरी ग्रुप जॉईन करा या बटनला क्लिक करून आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकतात.

👇👇👇👇
➡️➡️ पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर ⬅️⬅️

➡️➡️ पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर ⬅️⬅️