PM मोदींची मोठी घोषणा, गरिबांना आणखी 5 वर्षे मोफत रेशन मिळणार, 80 कोटी लोकांना होणार फायदा New Garib Kalyan Anna Yojana

PM मोदींची मोठी घोषणा, गरिबांना आणखी 5 वर्षे मोफत रेशन मिळणार, 80 कोटी लोकांना होणार फायदा New Garib Kalyan Anna Yojana

Garib Kalyan Anna Yojana : नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खूप मोठी घोषणा केली असून या घोषणेबद्दल आपण या पोस्टमध्ये माहिती पाहणार आहोत. प्रधानमंत्री छत्तीसगड येथे बोलत असताना त्यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली असून या योजनेचा लाभ भारतातील सर्व नागरिकांना मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील या तालुक्यांचे दुष्काळग्रस्त यादीतून वगळले नाव..! New Dushkal Nidhi Anudan List

Dushkal Nidhi Anudan List
Dushkal Nidhi Anudan List

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी छत्तीसगडला पोहोचले. दुर्ग जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना, PM मोदींनी जाहीर केले की मोफत रेशन योजना PMGKAY (प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना) आणखी 5 वर्षे वाढवली जाईल. पंतप्रधानांच्या या घोषणेचा देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.

म्हणजेच देशातील ज्या नागरिकांना याआधी मोफत रेशन मिळत होते अशा सर्व नागरिकांना परत एकदा पाच वर्षापर्यंत रेशन मोफत मिळणार असून या योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे जे नागरिक खरोखरच गरीब आहे, जे आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवू शकत नाही अशा सर्व नागरिकांना पुन्हा एकदा पाच वर्षे रेशन मोफत मिळणार आहे.

पीएम मोदी म्हणाले, ‘मी ठरवले आहे की भाजप सरकार आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना पुढील पाच वर्षांपर्यंत वाढवणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देतात.

काँग्रेसवर निशाणा साधत पीएम मोदी म्हणाले, ‘काँग्रेसने गरिबांना फसवणुकी शिवाय काहीही दिलेले नाही. काँग्रेस गरिबांचा कधीच आदर करत नाही. त्यामुळे काँग्रेस जोपर्यंत केंद्रात राहिली तोपर्यंत गरिबांचे हक्क लुटत राहिली आणि खात राहिल आणि आपल्या नेत्यांच्या तिजोरीत भरत राहतील.

पीएम मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आणि सांगितले की काँग्रेसने महादेवालाही सोडले नाही आणि बेकायदेशीर बेटिंग एप्लीकेशन द्वारे भ्रष्टाचाराने आपली तिजोरी भरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की मी छत्तीसगड भाजपच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो की त्यांनी कालच ठराव पत्र जारी केले ज्यामुळे तुमची स्वप्ने साकार होतील.

या ठराव पत्रात छत्तीसगडच्या माता-भगिनी, येथील तरुण आणि शेतकरी यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. छत्तीसगड साठी केंद्र सरकार खास योजना आणणार असून या योजनेअंतर्गत छत्तीसगड येथील नागरिकांना त्यांच्या राज्यातच रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. प्रधानमंत्री सभेत बोलत असताना मोठमोठ्या घोषणांचा पाऊस त्यांनी पाडलेला आहे.

पीएम मोदी यांनी घोषणांचा पाऊस पडलेला असून या घोषणा कधी पूर्ण होतील, हे सांगता येत नाही. पण गरिबांना पाच वर्ष मोफत रेशन ही घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सभे अंतर्गत केलेली आहे. ही योजना मात्र तातडीने लागू झालेली असून योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी गरिबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळणार आहे.

मोफत रेशन यादीत नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा