IMD Alert : महाराष्ट्रात पुढचे 4 ते 5 दिवस पाऊस, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

IMD Alert : महाराष्ट्रात पुढचे 4 ते 5 दिवस पाऊस, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने एक मोठा इशारा दिला आहे काही काही राज्यामध्ये विजांच्या कडकटासह पाऊस बरसणार आहे तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली परिसरात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज वेधशाळेने दर्शवला आहे. या ठिकाणी पुढील तीन ते चार तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे 30 ते 40 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहणार आहे. अशा परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. IMD Alert

हेही वाचा- Farming Insurance : 31 जुलै पर्यंत फक्त 1 रुपयात पीक विमा योजनेत सहभाग घ्या

Farming Insurance
Farming Insurance

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाचे आहे, कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही भागात मेघर्जीनेसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी राज्यात हवा तसा पाऊस पडलेला नाही आहे. काही ठिकाणी पेरण्याही रखडलेल्या आहेत. दमदार पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. IMD Alert

हेही वाचा- Kapus Bhav Today : महाराष्ट्रात कापूस बाजार भावात वाढ आजचे कापुस भाजर भाव

यवतमाळच्या नेर तालुक्यात ढगफुटी दृश्य पाऊस बरसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतातील सर्व पीक वाहून गेलेले आहे. अंकुरलेली पिके मुळासह उपटून शेतातून वाहून गेलेली आहे. एवढेच नाही तर शेतातील माती सुद्धा वाहून गेलेली आहे. शेतातील झाडे मुळांसह उपसून निघालेली आहे. तर काही ठिकाणी तुरीची पिके पाण्यात डुबलेली आहे. गेल्या वर्षीची अतिवृष्टी तसेच नापिकी उरलेल्या पिकांना भाव मिळाला नाही, आणि यंदा पहिल्याच पावसात पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. IMD Alert

हेही वाचा- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत बदल पहिला हप्ता 3000 रुपयांचा Namo Shetakari Mahasmman Nidhi

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई सकाळपासूनच कधी हलक्या स्वरूपाचा तर कधी जोरदार पाऊस पडत आहे. पावसाची रिमझिम सुरूच आहे. अनेक ठिकाणी शेतीपूरक पाऊस पडलेलाच नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहे. त्यामुळे पाऊस पडला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तर कोणत्या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पाहूया, आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. 18 जुलै रोजी रायगड पुणे आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आहे. 1920 जुलै साठी पालघर रायगड पुणे रत्नागिरी सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. IMD Alert