Ladaki Bahin Yojana लाडके बहीण योजनेला कात्री ! या महिलांना मिळणार नाही या हप्त्यातील लाभ

Ladaki Bahin Yojana लाडके बहीण योजनेला कात्री ! या महिलांना मिळणार नाही या हप्त्यातील लाभ

Ladaki Bahin Yojana निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडके बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत 9000 रुपये मिळालेले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना चालू केल्यामुळे, या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणावर वाजा गाजा करण्यात आला होता. आणि लाडकी बहीण योजनेच्या जोरावरच सरकार निवडून आल्याची चर्चा आहे.

लाडकी बहीण योजनेच्या जोरावर सरकार निवडून आले असले तरी आता काही लाडक्या बहिणींना या योजनेपासून मुखावे लागणार आहे. तर काही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा तरी अजून पर्यंत मिळालेला नाही. यासंबंधी सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

सरकारने मोठ्या थाटामाटात माझी लाडकी बहीण योजना Ladaki Bahin Yojana सुरू केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर महिलांनी या योजनेत अर्ज केला अशा सर्व महिलांना कुठलीही चौकशी न करता माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला. आणि लाडकी बहीण योजनेच्या जोरावर सरकार निवडून आले.

Cotton News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाब, सरकारने आयात केल्या 22 लाख कापसाच्या गाठी

परंतु आता माझी लाडकी वहिनी योजनेचा सरकारी तिजोरीवर खूप मोठा भार पडलेला आहे. हा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खिशाला कात्री लावायला सुरुवात केली आहे. कारण या योजनेतून बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना वगळण्यात आले आहे. ज्या महिलांनी पिवळा राशन कार्ड ऐवजी उत्पन्नाचा दाखला जोडला होता. अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आले आहे.

 

एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणीच्या घरात कुणाच्याही नावे चार चाकी गाडी असेल तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आलेला आहे. यामुळे सध्या ज्या लाडक्या बहिणींचा लाभ येणे बंद झाला आहेत अशा लाडक्या बहिणी अग्रेसर झाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी आम्हाला बहिणी केल्या आणि संपली तर लाथ मारली असे म्हणत आहे. Ladaki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही लाडक्या बहिणीच्या अर्जांची तपासणी सुरू आहे. ज्या महिलांच्या घरी चार चाकी गाडी त्यांच्या स्वतःच्या नावावर अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम असेल, आणि ज्या महिलांचे पिवळ्या किंवा केसरी राशन कार्ड नाव नसेल, अशा सर्व महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या Ladaki Bahin Yojana लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना कोणाला मिळणार लाभ ?

तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना लाभ मिळणार हे आपण खाली पाहूया. या महिलांचे नाव पिवळ्या किंवा केसरी राशन कार्ड मध्ये आहे अशा सर्व महिलांना माझी लाडकी वहिनी योजनेचा लाभ मिळणार. परंतु पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड मध्ये तुमचे नाव आहे आणि तुमच्या घरी चार चाकी गाडी असेल तर तुम्हाला या Ladaki Bahin Yojana योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहेत अशा महिलांना सुद्धा लाडके वहिनी योजनेचा लाभ मिळणार आहे. या अटीप्रमाणे ज्या महिलांचे अडीच लाखाच्या खाली उत्पन्न आहेत अशा महिलांना लाटकी बहिणी योजनेचा लाभ मिळेल परंतु त्यांच्याही घरी जर चार चाकी गाडी असेल तर या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेत पात्र आहात का येथे चेक करा

यामुळे सरकारने खरोखरच निवडणुकीच्या उद्देशाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती का अशी शंका लाडक्या बहिणींच्या मनात खूपच आहे. निवडून आले आणि आमची गरज संपली आता आम्हाला योजनेतून दूर करण्यात सरकार जराही वेळ लावत नाही असेच लाडक्या बहिणी म्हणत आहे.

माझी लाडकी वहिनी योजनेचा सरकारी वर खूप मोठा भार पडत असल्यामुळे, सरकारने शिव भोजन थाली योजना बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच राशन दुकानात मिळणारा शिधा सुद्धा बंद करण्याची योजना सरकारने घेतला आहे. म्हणजे एकीकडे या आधी निवडून आलेल्या सरकारने या योजना सुरू केले आहेत त्याच योजना बंद करून आपण सुरू केलेल्या योजना चालू ठेवण्याचा प्रयत्न तात्कालीन सरकार करत आहे.

सरकारच्या विविध योजनांच्या माहितीसाठी वरील असलेल्या शेतकरी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment