Pm कुसुम सोलार योजना नवीन नोंदणी 2023
Pm कुसुम सोलार 2023 आपण आज पाहणार आहोत PM कुसुम सोलार योजनेसाठी पुन्हा नव्याने 2023 मध्ये अर्ज सुरू होणार आहे. त्यासाठी पात्रता निकष व अटी व आलेला नवीन GR नुसार नवीन मार्गदर्शक सूचना आणि आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे याची माहिती घेऊया.
PM कुसुम सोलर योजनेसाठी लाभार्थी कोण राहणार आहेत, व आवश्यक बाबी काय आहेत, हे पाहूयात. पम कुसुम सोलार योजनेसाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणे गरजेचे आहे. म्हणजेच आपल्याकडे विहीर आहे, बोरवेल आहे, शेततळे आहे यापैकी कोणताही एक शाश्वत स्रोत उपलब्ध असणे गरजेचे आहे.
त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही, असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील म्हणजेच आपल्याकडे कोणतेही शेतीसाठी असणारे लाईट कनेक्शन नसावे, तरच आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येईल. त्यानंतर या योजनेच्या लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी 5 टक्के व इतर जातीसाठी 10 टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे.
म्हणजेच आपल्याकडे पाण्यासाठी एक स्त्रोत असणे आवश्यक आहे दुसरे म्हणजे तुम्हाला तुमच्या नावावर ती शेतकऱ्याच्या नावावरती लाभार्थ्याच्या नावावरती कोणतेही वीज कनेक्शन नसावे व लाभ घेण्यासाठी 10 टक्के रक्कम व इतर जमातीसाठी 5 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.
आपल्याला आपल्या जमिनीच्या निकषानुसार कोणता पंप भेटणार आहे, म्हणजे किती HP चा पंप भेटणार आहे, आणि त्यासाठी आपल्या कॅटेगिरी नुसार आपल्याला किती रक्कम भरायचे आहे, तर पहिला म्हणजे 3HP 3 HP साठी आपल्याकडे 2.5 एकरच्या आत मध्ये जमीन असणे आवश्यक आहे, म्हणजे 2.5 एकरच्या आत जमीन आहे तर तुम्हाला 3HP पंप भेटणार आहे. त्यासाठी अगोदर कोणतीही कास्ट असो एससी एसटी सोडून तुम्हाला एकूण 19380 रुपयाचा वर्ण करायचा आहे.
त्यानंतर एससी आणि एसटी साठी 9390 रुपये भरणा करायचा आहे. 5HP साठी 5 एकर जमीन असणे आवश्यक आहे, 5 एकर जमीन ज्यांच्याकडे आहे त्यांना 5HP चा पंप हा मिळणार आहे. तर ऑदर कास्टला 26975 रुपये हा भरणे करायचा आहे तर एसी आणि एसपी कॅटेगिरी साठी 13488 रुपयाचा भरणा करायचा आहे.
ज्यांच्याकडे 5 एकर पेक्षा जास्त जमीन आहे, त्यांच्यासाठी 7.5 HP चा पंप मिळणार आहे. तर त्यांच्यासाठी 37 हजार 440 रुपये भरणा करायचा आहे. तर त्याच पंपासाठी एससी आणि एसटी कॅटेगरी साठी 18720 रुपयाचा भरणा करायचा आहे. चला तर पाहूया नवीन 2023 मध्ये जी योजना सुरू होणार आहे पुन्हा नव्याने त्यासाठी नवीन अटी काय आहेत व नवीन सूचना आपल्याला काय मिळालेले आहेत.
प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी या नवीन सूचना ऑफिशियल वेबसाईट वरती देण्यात आलेले आहेत महा कृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी या नवीन सूचना आहेत. अटल सौर कृषी पंप योजना एक व दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे लाभ घेतलेले शेतकरी महा कृषी ऊर्जा अभियान PM कुसुम घटक ब योजनेसाठी पात्र नाहीत म्हणजेच आपण या अगोदर अटल सौर कृषी पंप योजना एक व दोन आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा नव्याने अर्ज हा करता येणार नाहीये.
आणि अर्ज केल्यानंतरही आपण पात्र राहणार नाहीत त्यामुळे त्यांनी कृषी ऊर्जा अभियान PM कुसुम घटक ब योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरू नयेत, तरीसुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल, महा कृषी ऊर्जा अभियान पीएम पासून घटक ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्यांनी एका सौर कृषी पंप करता अर्ज करावा एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर रद्द करण्यात येणार आहेत. तसेच असे निदर्शनात की उपरोक्त योजनेअंतर्गत कृषी पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषी पंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे घासून दुसरा सौर पंप महा कृषी ऊर्जा अभियान PM कुसुम घटक ब योजनेअंतर्गत स्थापित करून घेतात.
म्हणजेच काही शेतकरी काही लाभार्थी अगोदर मिळालेला सौर पंप हा काढून ठेवतात व पुन्हा नवीन अर्ज करून पुन्हा नव्याने लाभ घेतात अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषी पंप काढून घेण्यात येतील व त्यांनी भरलेली लाभार्थी रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांनी विरुद्ध FIR करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. म्हणजेच जी नव्याने पुन्हा अर्ज सुरू होणार आहेत त्यासाठी या मार्गदर्शक सूचनांचे पालन आपल्याला करावे लागणार आहे.
आणि अर्ज हे पूर्ण ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत म्हणजेच मेडा कडून जर आपल्याला 1 लाख पंपाचा कोटा आला तर एप्लीकेशन हे 1 लाख झाल्यानंतर वेबसाईट ऑटोमॅटिकली ही बंद होऊन जाते. त्यामुळे ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा आपल्याला अर्ज हा लवकरात लवकर करून घ्यायचा आहे. जास्त वेळ झाल्यास पूर्ण अर्जाची क्षमता ही संपल्यास आपला ही अर्ज एक्सेप्ट होणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद.