Pm Kisan: पी म किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या तारखेला

Pm Kisan: नमो शेतकरी योजनेचे व पीएम किसान योजनेचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या तारखेला.

नमस्कार शेतकरी मित्रांनो Pm Kisan पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला लागलेला असून. तो शेतकऱ्यांना कधी मिळणार या संदर्भात आपण या पोस्टमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर आपणही एक शेतकरी असाल तर आपल्याला सुद्धा या योजनेचा लाभ भेटू शकतो.

Pm Kisan पी एम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना डबल फायदा होणार आहे. Pm Kisan पी एम किसान योजनेचे 2000 रुपये, व नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यात एकदम 4000 रुपये जमा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्या यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान योजना लागू केली होती. याच अनुषंगाने राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.

Kusum Solar Pamp 2023: महाराष्ट्र मुख्यमंत्री सोलार पंप योजना, पात्र यादी जाहीर

Kusum Solar Pamp

Pm Kisan पी एम किसान योजनेअंतर्गत दर 4 महिन्यांनी तीन वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहे. म्हणजे वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा होणार आहे. याच योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजना सुरू झालेली असून या योजनेतही दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 म्हणजे बारा महिन्याला 6 हजार रुपये जमा होणार आहे.

Pm Kisan पी एम किसान योजना आणि नमो किसान योजना या दोन्ही योजनेचे 6-6 हजार रुपये, असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Pm Kisan आणि नमो शेतकरी या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील ते आपण खाली पाहूया.

  1. ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
  2. शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.
  3. त्याच्या वयाची किमान 18 वर्षे पूर्ण असावी.
  4. त्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावी.
  5. त्याच्या बँक खात्याशी त्याचे आधार कार्ड लिंक असावे.

वरील अटी पूर्ण करणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांना Pm Kisan आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर या योजनेत आहे किंवा नाही हे आपण ऑनलाईन पद्धतीने जमा केली जातील. आपले नाव या योजनेत आहे की नाही. हे आपण ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतात.

ऑफलाइन पद्धतीने आपले नाव यादीत आहे का पाण्यासाठी आपल्याला जवळील तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. किंवा आपण जवळील सेतू सुविधा केंद्राशी सुद्धा संपर्क साधू शकतात. येथे आपले नाव पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेत आहे की नाही हे आपल्याला कळेल.

जर आपले नाव या योजनेत नसेल तर आपण आपले नाव या योजनेत सहभागी सुद्धा करू शकतात. आपले नाव योजनेत सहभागी करण्यासाठी आपण आपल्या तलाठी ऑफिसशी संपर्क साधावा, याच्यासाठी काही कागदपत्रे लागत असतात. या कागदपत्रांची लिस्ट आपल्याला तलाठी ऑफिस मधून भेटेल, सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आपण आपले नाव यादीत समाविष्ट करून घ्यावी.

पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची जमीन आहे, सातबारा त्या शेतकऱ्याचे नाव आहे, अशा सर्व शेतकरी मित्रांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे सर्व पैसे ऑनलाईन पद्धतीने खात्यात जमा केले जाणार आहे.

आता सर्व शेतकरी मित्रांचे लक्ष लागलेले आहे, pm kisan आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या खात्यात कधी जमा होतील, तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जाणकारांच्या मध्ये जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व शेतकरी मित्रांना याचे वितरण केले जाईल.

बऱ्याच शेतकरी मित्रांना या योजनेची पुरेपूर माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुद्धा होत आहे. शेतकऱ्यांना फर्जी कॉल येत आहे आणि नमो शेतकरी योजनेतून आपले नाव काढण्यात आले आहेत असे सांगण्यात येते. आणि आपण ऑनलाइन पद्धतीने आपले नाव परत सबमिट करू इच्छित असाल तर आपण लगेचच आपली बँक डिटेल द्यावी असे सांगण्यात येते.

काही वेळाने परत कॉल करून या योजनेत आपली बँक डिटेल सबमिट करण्यासाठी किमान 500 रुपये लागत आहे असे सांगण्यात येते. आणि शेतकऱ्यांना phone pe किंवा paytm च्या माध्यमातून पेमेंट करण्यास सांगण्यात येते. शेतकऱ्यांना वाटते की खरेच आपले नाव यादीतून गहाळ झालेले आहे, त्याचमुळे आपले पैसे बँकेत जमा झाले नाही.

आणि शेतकरी अशा खोट्या कॉल करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवून देतात, आणि समोरील व्यक्ती त्यांना तुमचे नाव यादीत समाविष्ट केले आहेत असे सांगतात, आणि लवकरच तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील असेही सांगण्यात येते. परंतु सर्व शेतकरी मित्रांना सुचित करण्यात येते की कुठल्याही कॉलवर आपण आपली बँक डिटेल किंवा कुठल्याही व्यक्तीच्या म्हणण्यावरून ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करू नये.

वर दिलेली माहिती आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांंबरोबर शेअर करावी.

शेती विषयक नवनवीन माहिती आणि योजनांची पुरेपूर माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा. आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्याला महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व योजनांची माहिती वाचायला मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now