PM kisan 14th installment : pm किसान योजनेचे पैसे हवे आहे तर तात्काळ करा हे काम, शेतकऱ्यांना मानसिक 6 हजार रुपये मानधन देणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे पी एम किसान (PM kisan) योजना.
PM kisan योजनेचा चौदावा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात येणार असून, त्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे बँकेला जोडणे आवश्यक आहे. त्यातील सर्वात पहिले म्हणजे आधार कार्ड आपल्या बँकेची जोडणे अनिवार्य आहे.
PM kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी Indain post बँकेतून आपलं खाते खोलावे अशा प्रकारचे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून एक पत्र काढून करण्यात आले आहे.
P.M kisan योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी के वाय सी करणे, फिजिकल वेरिफिकेशन करणे, याचबरोबर लाभार्थ्याच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अटी आहेत.
एका सर्वेनुसार असे लक्षात आले आहे, की राज्यातील 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक झालेली नाही. त्यामुळे पी एम (PM kisan) किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण त्यांच्या खात्यात होण्यास अडचण निर्माण होणार आहे.
PM kisan योजनेचा चौदावा हप्ता प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा यासाठी एक मोहीम 15 मे 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. आणि याच मोहिमेच्या अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी इंडियन पोस्ट बँकेतून आपले खाते खोलून घ्यावी. आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करावे अशा प्रकारचे आवाहन करण्यात येत आहे.
indian post bank मध्ये खाते खोलण्यासाठी कमीत कमी 200 रुपये डिपॉझिट करून आपले खाते खुलल्या जाते, आणि 48 तासाच्या आत त्या खात्याला पॅन कार्ड लिंक केल्या जाते.
शेतकऱ्यांनी इतर बँकेमध्ये खाते खोलेले असून आधार कार्ड सुद्धा लिंक केलेले आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्याशी आधार कार्ड लिंक दाखवत नसल्यामुळे त्यांना सुद्धा pm kisak योजनेचा लाभ मिळणार नाही.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्याशी आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा तपासून घ्यावे. नाहीतर इंडियन पोस्ट बँकेमध्ये 200 रुपये डिपॉझिट करून आपले खाते खोलावे आणि 48 तासाच्या आत आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे.
Pm kisam योजनेचा चौदावा हप्ता कधी मिळणार
तर शेतकरी मित्रांनो सर्व नागरिकांना आता (PM kisan) पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळालेला असून चौदावा हप्ता केव्हा मीळणार याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. सध्या कर्नाटक या राज्याच्या निवडणुका सुरू असल्यामुळे 14 वा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे.
PM kisan किसान योजनेचा चौदावा हप्ताह 22 मे पासून 5 जूनच्या कालावधीमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त हप्ता हा 5 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. अशी माहिती समोर आलेली आहे.
याचबरोबर केंद्र सरकारच्या बरोबरच राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेचा सुद्धा पहिला हप्ता पी एम किसान (PM kisa) योजनेबरोबरच देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत जे शेतकरी 15 मे पर्यंत पात्र होतील अशा सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजना आणि सी एम किसान योजना या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे. सी एम किसान योजनेचा नवीन GR लवकरच येणार असून त्याबद्दल सुद्धा माहिती पुढे आपल्याला बघायला भेटणार आहे.
तर शेतकरी मित्रांनो अद्यापही जर आपण आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले नसेल, किंवा आपण आधार कार्ड लिंक केलेले आहे तरीसुद्धा आपल्या खात्याशी आधार कार्ड लिंक दाखवत नसेल, तर लवकरात लवकर आपण आपल्या खात्याशी आधार कार्ड लिंक आहे, याची खात्री आपल्या बँकत जाऊन करावी.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान