Pm Kisan Yojana : पी एम किसान योजनेचे 2000 रुपये मिळण्याची तारीख ठरली, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याची तारीख. Pm Kisan Yojana udate

Pm Kisan Yojana : पी एम किसान योजनेचे 2000 रुपये मिळण्याची तारीख ठरली, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याची तारीख.

नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर Pm Kisan Yojana चे 2000 येण्याची तारीख ठरली. सर्व शेतकरी मित्रांना आता पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याची आज लागून राहिली होती. बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांना पेरणीसाठी पैशाची सुद्धा टंचाई भासत होती. अशातच सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली असून, Pm Kisan Yojana योजनेचे पैसे जमा होणार आहे.

Pm Kisan Yojana ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना असून, या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असतात, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आलेले असून 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहेत. आणि चौदाव्या हफ्त्याची सर्वच शेतकरी वाट पाहत आहे.

Pm Kisan Yojana बद्दल अधिक जाणून घ्यायचे झाले तर, लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षातून 6000 रुपये मिळतात, हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकदम जमा न होता, चार महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून तीनदा जमा होतात, प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जातात.

असे एका वर्षात एकूण शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये Pm Kisan Yojana योजनेअंतर्गत 13 हप्ते, म्हणजे एकूण 26000 रुपये जमा झालेले आहेत. आणि आता चौदाव्या त्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण खाली पाहू.

रासायनिक खतांचे दर झाले कमी ! पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा

Chemical

सर्व शेतकरी आता शेतीच्या कामाला लागलेले असून, आपणा सर्व शेतकरी मित्रांना माहीतच आहे की पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना पैशाची खूप त्यांचाही भासत असते, याच काळामध्ये Pm Kisan Yojana पैसे जमा होणार आहे. काही जिल्ह्यांचे नावे समोर आलेली असून या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल.

तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पैशामुळे शेतकऱ्यांना पैशाची अडचण बसणार नाही या अनुषंगाने सरकारने चौदावा हप्ता जुलैमध्ये देण्याचे ठरवले आहे. वास्तविक पाहता हा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे होता. कारण शेतीसाठी सर्वात जास्त पैशाची अडचण ही जून महिन्यामध्ये असते.

जर आपण एक शेतकरी आहात आणि मागचे 13 हप्त्यांचा लाभ आपल्याला भेटलेला असेल, तर चौदाव्या त्यासाठी आपल्याला काहीही करण्याची गरज पडणार नाही. ज्यावेळेस आपल्या जिल्ह्याचा नंबर लागेल त्यावेळेस आपल्या खात्यामध्ये Pm Kisan Yojana चे पैसे जमा होऊन जातील.

पण जर आपण एक शेतकरी असून सुद्धा आपल्या खात्यावर Pm Kisan Yojana चे पैसे जमा होत नसेल तर आपल्याला काही कागदपत्रे पूर्ण करावी लागतील. त्यावेळेस आपल्या खात्यात Pm Kisan Yojana चे पैसे जमा होतील. ही कागदपत्रे कुठल्या प्रकारची असेल आपल्या खात्यात योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय कारवाई करावी लागेल याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण खाली पाहू.

जर आपण एक शेतकरी आहात आणि आपल्या खात्यावर Pm Kisan Yojana चे पैसे जमा होत नसेल. तर सर्वात प्रथम आपल्या नावावर आपल्या जमिनीचा सातबारा आहे का हे चेक करून घ्यावे. जर आपण शेतकरी आहात आणि आपल्या नावावर कुठल्याही प्रकारची जमीन नाही तर आपल्याला या योजनेचा लाभ भेटू शकणार नाही.

जर आपण शेतकरी आहात आणि आपल्या नावावर सातबारा सुद्धा आहे तरीसुद्धा आपल्या खात्यावर Pm Kisan Yojana चे पैसे जमा होत नसतील, तर आपण आपल्या बँक खात्याची आपले आधार कार्ड लिंक करावे. जर आपल्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक नसेल तरीसुद्धा आपल्या खात्यात Pm Kisan Yojana चे पैसे जमा होणार नाही.

Pm Kisan Yojana चे पैसे आपल्या खात्यात घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अजूनही काही कारवाई करणे गरजेचे आहे, जर आपण नवीन जमीन खरेदी केली असेल, तर आपण ऑनलाईन पद्धतीने Pm Kisan Yojana साठी नोंदणी करावी. नोंदणी करण्यासाठी आपण pm kisan च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी.

जर शेतकरी स्वतः ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकत नसेल, तर आपण जवळील सेतू सुविधा केंद्रात जाऊन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात. सेतू सुविधा केंद्र ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची गरज लागणार आहे. सर्वात प्रथम आपल्या जमिनीचा सातबारा, बँक पासबुक, आधार कार्ड असे कागदपत्र आपण सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे.

Pik Vima Yadi 2023: सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

जर आपण ऑफलाइन पद्धतीने Pm Kisan Yojana साठी नोंदणी करू इच्छित असाल, तर शेतकऱ्यांनी वर दिलेली सर्व कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. तलाठी कार्यालयातून सुद्धा आपल्याला पी एम किसान योजनेत सहभागी करून घेण्यात येईल. आणि नवीन शेतकऱ्यांना जेव्हा नोंदणी केली जाईल तिथून पुढे या योजनेचा लाभ मिळेल.

Pm Kisan Yojana संबंधी कुठलीही शंका किंवा चौकशी करायची असल्यास आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा, आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर आपल्याला महाराष्ट्रातील संपूर्ण शेती विषयक योजनांची माहिती मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Whatsapp Group Join Now

Pm Kisan Yojana नाव नोंदणी चालू आहे क्लिक करा