Tractor Anudan Yojana 2023 | शेतकऱ्यांसाठी विशेष ट्रॅक्टर अनुदान योजना आजच अर्ज करा

Tractor Anudan Yojana 2023 | शेतकऱ्यांसाठी विशेष ट्रॅक्टर अनुदान योजना आजच अर्ज करा, महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना महाडीबीटी पोर्टल वर राबवण्यात येत आहेत. या योजनांपैकी कृषी यांत्रिकीकरण ही एक मुख्य योजना असून शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी विविध प्रकारचे अनुदान दिले जाते.

आणि शेतकरी मित्रांनी महाडीबीटी पोर्टल मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खुद्द महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येते. . महाडीबीटी पोर्टल अंतर्गत चालवली जाणारी एक योजना म्हणजे Tractor Anudan Yojana 2023 होय. आज आपण याच योजनेची माहिती पाहणार आहोत.

Tractor Anudan Yojana 2023 या योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसाह्य देते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे म्हणजेच ट्रॅक्टर साठी जे काही अवजारे लागतात त्या सर्व अवजारे घेण्यासाठी अनुदान देणे.

Tractor Anudan Yojana 2023 या कृषी यंत्रासाठी/अवजारांसाठी मिळणार अनुदान

  • ट्रॅक्टर
  • ट्रॅक्टर पावर डीलर दलितअवजारे
  • पावर डीलर
  • बेलचलित यंत्र व अवजारे
  • मनुष्यचलित यंत्र व अवजारे
  • फलोत्पादन यंत्र व अवजारे
  • स्वयंचलित यंत्रे
  • व शेतीसाठी लागणारी इतर अवजारे

वरील सर्व बाबींसाठी अनुदान किती दिले जाणार आहेत व कसे दिले जाणार आहेत हे आपण येथे बघू शकता

Tractor Anudan Yojana 2023 साठी लागणारी कागदपत्रे

  • लाभार्थी व्यक्तीकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थी व्यक्तीकडे सातबारा व उतारा आठ असावा.
  • शेतकरी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या जातीचा दाखला आवश्यक्य आहे.
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • एकूण जमिनीचा दाखला

Tractor Anudan Yojana 2023 या योजनेचा लाभ फक्त एकाच अवजारासाठी मिळणार आहे, म्हणजे एकतर ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान मिळेल किंवा ट्रॅक्टर साठी लागणारे अवजारे याच्यासाठी अनुदान मिळेल.

सदरील लाभार्थ्याकडे ट्रॅक्टर असेल आणि ट्रॅक्टर साठी लागणारे अवजारे साठी अनुदान मिळायचे असतील तर ट्रॅक्टर असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. एखाद्या अवजारांसाठी लाभ घेतलेला असल्यास त्याच घटकातील अवजारांसाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही. परंतु इतर अवजारांसाठी अर्ज करता येईल.

Tractor Anudan Yojana 2023 या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यावर लॉटरी पद्धतीने या योजनेत लाभार्थ्यांची निवड केली जाते. ज्याही लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीतून झालेली आहेत, हे सर्व लाभार्थी या योजनेअंतर्गत शेतीसाठी पूरक अवजारे घेऊ शकतात.

Tractor Anudan Yojana 2023 या योजनेत सरकार अवजारांवरती किती टक्के अनुदान देते हे आपण बघूया. सरकारद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर योजनेमध्ये खरेदीवर 20 ते 50 टक्के सबसिडी डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा करते. म्हणजे आधी सर्व पैसे हे शेतकऱ्याला भरावे लागतात, नंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सबसिडी जमा केली जाते.

Tractor Anudan Yojana 2023 या योजनेचा लाभ भारतातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांनी लाभ घेतला असून अजूनही बरेच सारे शेतकरी मित्र या योजनेसाठी अर्ज करत असतात.

ट्रॅक्टर बरोबरच सरकार शेतकऱ्यांसाठी इतरही योजना राबवत असते, त्यातीलच एक योजना म्हणजे कुसुम सोलार योजना. कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीजी कनेक्शन गेलेले नाही अशा शेतकऱ्यांना सोलार योजना अंतर्गत सोलार पंपावर अनुदान देण्यात येते.

कुसुम सोलार योजनेमुळे लोड शेडिंग चा त्रास शेतकऱ्यांना होत नाही. कारण सोलार पंप हा पूर्णपणे सूर्याच्या प्रकाशावर चालत असतो. जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत आपण शेताला पाणी देऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचे शेताला पाणी देण्याची गरज पडत नाही.

कुसुम सोलार योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर सोलार पंप बसवलेले असून शेतकऱ्यांना दिवसा शेताला पाणी देण्याचे नियोजन झालेले आहेत. सोबतच त्यांचा त्रासही वाचला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सोलार वर चालणाऱ्या पंपाला कुठल्याही प्रकारचे विज बिल येत नाही.

कुसुम सोलार योजनेची माहिती आपण येथे बघू शकता

Pm कुसुम सोलार

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना म्हणजे विहीर अनुदान योजना, विहीर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदकाम करण्यासाठी तब्बल 4 लाख रुपये अनुदान दिल्या जाते.

पूर्वी शेतकरी विहीर योजना यासाठी तीन लाख रुपये सरकार अनुदान द्यायचे आता याची मर्यादा वाढवून चार लाखापर्यंत झाली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी चार लाखापर्यंत अनुदान मिळणार आहेत.यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी GR काढला आहे.

शेतकरी विहीर योजनेअंतर्गत केवळ विहीर ण्यासाठी 4 लाख रुपये अनुदानच नव्हे, तर त्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना सोलार पंप देण्यात यावी हे सुद्धा GR मध्ये नमूद करण्यात आले आहे. शेतकरी विहीर योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचन सुविधा देखील उपलब्ध करून देणार आहे.

अशाप्रकारे सरकार हे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे, अशा योजनांचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. आणि या योजनांची जास्तीत जास्त माहिती आपण येथे पोस्ट करत असतो. ही माहिती आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी धन्यवाद.